आमदार योगेश टिळकरांच्या मामांचा खून : पुण्यात खळबळ
![](https://breakingmaharashtra.com/wp-content/uploads/2024/12/WAGH.gif)
Murder of MLA Yogesh Tilkar’s maternal uncle: Excitement in Pune पुणे (9 डिसेंबर 2024) : भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हे सोमवारी पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडल्यानंतर त्यांचा अपहरण केल्यानंतर खून करण्यात आला. या घटनेने शहरात खळबळ उडाली. सोमवारी पहाटे फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या वाघ यांना एका वाहनात चौघांनपी जबरदस्तीने बसवत त्यांना उचलून नेल्यानंतर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला तर सोमवारी सायंकाळी यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला.
खुनाच्या घटनेने शहरात खळबळ
या खुनाच्या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरून गेले आहे. सत्ताधारी पक्षाचा लोकप्रतिनिधी असलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाचे अपहरण करून खून होत असेल तर सर्वसामान्यांचं काय? असा प्रश्न आता विचारला जात आहे. मागील काही दिवसांपासून पुणे शहरात गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. पाच दिवसात खुनाचे पाच प्रकार घडले आहेत.
![](https://breakingmaharashtra.com/wp-content/uploads/2025/02/mantri-niwad.jpg)
चौघांनी अपहरण करीत केला खून
सतीश वाघ हे हडपसरच्या मांजरी परिसरात कुटुंबीयांसह राहत होते. वाघ कुटुंबीयांचे मांजरी परिसरात लॉन्स आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणात शेती ही आहे. अतिशय शांत म्हणून ओळख असलेले सतीश वाघ नेहमीप्रमाणे आज पहाटे मॉर्निंग वॉक करण्यासाठी बाहेर पडले होते. मांजरी येथील घरातून बाहेर पडल्यानंतर काही अंतर जाताच त्यांचे अपहरण झाले होते. दबा धरून बसलेल्या चार जणांनी एका चार चाकी गाडीत त्यांना जबरदस्तीने बसवले आणि पळवून नेले होते.