शिरपूर शहर पोलिसांची मोठी कामगिरी : चार लाखांच्या बनावट नोटांसह तिघांना पकडले


Shirpur city police’s big achievement : Three arrested with fake notes of Rs 4 lakh शिरपूर (3 फेब्रुवारी 2025) : शिरपूर शहर पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे चार लाखांच्या बनावट नोटांसह त्रिकूटाला बेड्या ठोकल्या आहेत. पुंडलिक ऊर्फ समाधान नथा पदमीर (27, रा.हट्टी, ता.शिरपूर), पीरन सुभाष मोरे (23, रा.चांदपुरी, ता.शिरपूर), रंगमल रतीलाल जाधव (25, रा.ऐचाळे, ता.साक्री) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दरम्यान, बनावट नोटांसह स्थानिक आरोपी पकडण्यात आल्यानंतर शहरातील नागरिकांसह व्यापार्‍यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. आरोपींचे नेटवर्क व त्यांनी यापूर्वी काही नोटा व्यवहारात चलनात आणल्या का ? याचा तपास करण्याचे आव्हान यंत्रणेपुढे आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर शहर पोलिसांना बनावट नोटांबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचत शिरपूर येथील खालच्या गावात बनावट नोटांसह तिघांना ताब्यात घेतले. संशयीतांच्या बॅगेची झडती घेतली असता त्यात पाचशे रुपये दराच्या चार लाख 11 हजार 500 रुपये किंमतीच्या बनावट नोटा, 10 हजारांचा मोबाईल, सव्वा लाखांची पल्सर (एम.एच.18 सी.बी.8567) जप्त करण्यात आली.





यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस निरीक्षक के.के.पाटील, सहाय्यक निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक हेमंत खैरनार, हवालदार आर.एस.रोकडे, कॉन्स्टेबल भटू साळुंके, कॉन्स्टेबल योगेश दाभाडे, कॉन्स्टेबल सचिन वाघ, कॉन्स्टेबल विनोद आखडमल आदींच्या पथकाने केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !