जळगाव मनपाच्या लाचखोर सहाय्यकाला जामीन तर नगररचना सहायक संचालकाची उचल-बांगडी
Jalgaon Municipal Corporation’s bribe-taking assistant gets bail, while Assistant Director of Urban Planning gets a lift-bangle जळगाव (13 डिसेंबर 2024) : महानगरपालिकेतील नगररचना विभागातील लाचखोरीत आयुक्तांसह सहायक संचालकांचे नाव आल्याने राज्य शासनाकडून दखल घेण्यात आली. नगररचना विभागाच्या सहायक संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार दिघेश तायडे यांच्याकडून काढून घेण्यात आला नगररचनाकार अमोल पाटील यांच्याकडे हा कार्यभार सोपविण्यात आला आहे. सहसचिव सुबराव शिंदे यांनी हे आदेश जारी केले आहेत.
कॉल केल्यावर हजेरी देण्याच्या आदेशानंतर लाचखोर अधिकार्याला जामीन
मनपातील नगर रचना सहायक मनोज समाधान वन्नेरे (34) यांची गुरुवार, 12 रोजी न्यायालयाने जामिनावर सुटका केली. तपासकामी तपासाधिकार्यांनी कॉल केल्याबरोबर पोलीस ठाण्यात हजर व्हावे या अटीवर जामीन देण्यात आला. गुन्ह्याच्या तपासकामी तपासाधिकार्यांनी कॉल अथवा बोलविल्यात तत्काळ पोलीस ठाण्यात हजर व्हावे लागेल. विना परवानगीने शहरबाहेर जाता येणार नाही या अटीवर न्यायालयाने 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन न्यायालयाने मंजूर केला.
वन्नेरे यांच्या कपाटाचे सील उघडले
मनोज वन्नेरे याला जामीन मंजूर झाल्याने तो कामकाज करीत असलेला कक्ष व कपाटाचे सील उघडण्यात आले. गुरुवारी एसीबीचे उपअधीक्षक योगेश ठाकूर, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील यांच्यासह कर्मचार्यांचे पथक सायंकाळी महापालिकेत धडकले त्यांनी सर्वात आधी सील उघडले. त्यानंतर रचनाकार अमोल पाटील यांच्या दालनात जाऊन त्यांनी या विभागातील कामकाज कसे चालते याची माहिती घेतली. प्रस्ताव दाखल झाल्यानंतर ते सर्वात आधी कोणाकडे जातो. त्याची पद्धत कशी व अंतिम मंजुरी, शासकीय चलन याची माहिती जाणून घेताना लाचखोरी नेमकी कशी झाली याचीही माहिती घेतली. काही प्रस्ताव अधिकार्यांना अंधारात ठेवून मंजूर केले जात असल्याचे समोर आले.