झुकेगा नही…! ‘पुष्पा’ ला अटक मात्र उच्च न्यायालयाकडून जामीन


हैदराबाद (14 डिसेंबर 2024) : सिने अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता मात्र कर्नाटक उच्च न्यायालयाने पुष्पा अर्थात अल्लू अर्जुनला जामीनही दिला आहे.

अपिल करताच जामीन
अल्लू अर्जुनला शुक्रवारी दुपारी 12 वाजता त्याच्या घरातून अटक करण्यात आली. दुपारी चार वाजता स्थानिक न्यायालयात हजर केले असता, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. यानंतर अभिनेत्याने उच्च न्यायालयात अपील करताच सायंकाळी पाच वाजता जामीन मंजूर झाला.

का झाली अटक ?
4 डिसेंबरला हैदराबादच्या संध्या थिएटरमध्ये न कळवता अल्लू अर्जुन पोहोचल्याचा आरोप आहे. त्यामुळे तेथे जमाव जमा झाला आणि चेंगराचेंगरी होवून एका महिलेचा मृत्यू ओढवला होता.


कॉपी करू नका.