बोदवड-मलकापूर खंडात स्वयंचलित सिग्नल प्रणाली कार्यान्वित


भुसावळ (18 डिसेंबर 2024) : भुसावळ विभागातील बोदवड-मलकापूर (19.81 किमी) खंडामध्ये स्वयंचलित सिग्नल प्रणाली सोमवार, 16 डिसेंबर रोजी यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आली. या कामाला वित्तीय वर्ष 2021-2022 च्या कार्ययोजनेत पीएच-33 अंतर्गत मंजूर करण्यात आला होता. या कार्यासाठी चार दिवस प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि एक दिवस नॉन-इंटरलॉकिंग अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले होते. 12 ते 15 डिसेंबर या कालावधीत प्री-एनआय काम पूर्ण झाले तर 16 डिसेंबर 2024 रोजी 10 तासांच्या डिस्कनेक्शनसह नॉन-इंटरलॉकिंग कार्य यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.

बोदवड स्टेशनमध्ये सिग्नलिंग पूर्ण
या कामाअंतर्गत, दोन संपूर्ण ब्लॉक सेक्शन (बोदवड-खामखेड आणि खामखेड-मलकापूर) स्वयंचलित ब्लॉक सेक्शनमध्ये रूपांतरित करण्यात आले. या खंडात 17 स्वयंचलित सिग्नल आणि 2 सेमीऑटोमॅटिक -स्वयंचलित सिग्नल (डाउन दिशेसाठी) तसेच 15 स्वयंचलित सिग्नल आणि 1 सेमीऑटोमॅटिक-स्वयंचलित सिग्नल (अप दिशेसाठी) बसवण्यात आले आहेत. यासह वरणगाव-अकोला विभागात आता 76.43 किमीचे स्वयंचलित सिग्नलिंग पूर्ण झाले आहे. बोदवड स्टेशन आता पूर्णपणे स्वयंचलित सिग्नलिंग स्टेशन झाले आहे.

रेल्वे वाहतूक क्षमता वाढणार !
स्वयंचलित सिग्नल प्रणालीमुळे भुसावळ-बडनेरा खंडात रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढेल तसेच लाईन क्षमता सुधारलणार असून गाड्यांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. स्टेशन्स दरम्यान प्रत्येक एक किमी अंतरावर सिग्नल बसवण्यात आल्याने दर एक किमी सेक्शनमध्ये एक ट्रेन चालवणे शक्य होईल. यामुळे गाड्यांचा वेग वाढेल आणि गाड्यांचा खोळंबा कमी होईल.


कॉपी करू नका.