विधान परिषदेत आमदार एकनाथ खडसे संतापले ; म्हणाले, माझ्यावर तुमचा एवढा आकस का ?


नागपूर (18 डिसेंबर 2024) : माजी मंत्री व आमदार एकनाथ खडसे हे विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना वेळ संपल्याची बेल वाजता त्यांचा पारा चढला. खडसेंनी तालिका अध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त केली. माझ्यावर तुमचा एवढा आकस का आहे? असा प्रश्न खडसे करताच सत्ताधारी बाकावरून शंभूराज देसाई उठले आणि त्यांनी मध्यस्थी करत आकस हे वाक्य मागे घ्यावे, अशी विनंती खडसेंना केली.

खडसेंचा प्रश्न तालिका अध्यक्षांचे उत्तर
तालिका अध्यक्ष डावखरे म्हणाले, आपली दहा मिनिटं झाली आहेत. त्यावर खडसे म्हणाले, नाही. मी म्हटलंच होतं की, तुम्ही आल्यावर माझ्यात खोडा घालणार. तालिका अध्यक्ष म्हणाले, 11.27 चालू केलं. 11.37 ला बेल वाजली.

त्यानंतर खडसे संतापले. म्हणाले, मी वेळ दिलेली आहे. मी भाषण थांबवतो. मला वेळ सांगा. मी भाषण करताना तुम्ही आले आणि म्हणून मी वेळ दिली. दुसरा असता तर वेळ दिली नसती. मला माहितीये की, तुम्ही असल्यानंतर कधीही… म्हणजे आजपर्यंतचा माझा अनुभव आहे. मी तुमच्या आक्षेप घेत नाहीये. मला वेळ सांगा. माझं भाषण मी थांबवतो.

माझी तुमची दुश्मनी आहे का?
तालिका अध्यक्ष म्हणाले, इकडे नोंद केलेली आहे. 11.27 ला आपण भाषण सुरू केलेलं आहे. एकनाथ खडसे म्हणाले, 25-25 मिनिटं बोलतात त्यावेळी त्यांना थांबवायला आपल्याला वेळ नाही. तालिका अध्यक्ष म्हणाले, फक्त विरोधी पक्षनेते 25 मिनिटं बोलले आहेत. बाकीचे वक्ते 10-15 मिनिटं बोलले आहेत. त्यानंतर खडसेंचा पारा चढला. ते म्हणाले, दरेकर बोलले 22 मिनिटं, साठे बोललेत 15 मिनिटं. तुमचा माझ्यावर एवढा आकस का आहे हो?, असे खडसे म्हणतात तालिका अध्यक्ष डावखरे म्हणाले, माझा तुमच्यावर आकस असण्याचे काहीच कारण नाहीये. त्यानंतर खडसे पुन्हा म्हणाले की, माझी तुमची काय दुश्मनी आहे? तालिका अध्यक्ष म्हणाले, काहीच दुश्मनी नाहीये. तालिका अध्यक्ष डावखरे आणि खडसेंमध्ये शाब्दिक चकमक सुरू असतानाच शंभूराज देसाई उठले आणि आकस शब्द हटवण्याची मागणी करत त्यांनी मध्यस्थी केली.

शंभूराज देसाई म्हणाले, नाथाभाऊ म्हटले तुमचा एवढा आकस का? असा शब्दप्रयोग करणे, हा त्या पदावर हेतू आरोप करण्यासारखा आहे. त्यामुळे आपण हे तपासून घ्या. आणि पिठासीन अधिकार्‍यावर असा हेतू आरोप करणे.


कॉपी करू नका.