दोन भरधाव दुचाकी समोरा-समोर धडकल्या : गारखेड्यातील अल्पवयीन मुलाचा मृत्यू, पाच जण जखमी


Two speeding two-wheelers collide head-on: Minor boy dies, five injured in Garkheda धरणगाव (18 डिसेंबर 2024) : दोन दुचाकींमध्ये झालेल्या धडकेत गारखेडा येथील अल्पवयीन मुलाचा मृत्यू ओढवला तर पाच जण जखमी झाले. हा अपघात सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास गारखेडा-धरणगाव रस्त्यावर घडला. प्रथमेश सुधाकर पाटील असे मयताचे नाव आहे.

काय घडले नेमके ?
सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मित्राचा वाढदिवस असल्याने गारखेडा येथील प्रथमेश सुधाकर पाटील तसेच वैभव विठ्ठल देशमुख (अनोरे), हितेश भगवान भोई (अनोरे), शिवराज पंकज पाटील (गारखेडे) हे इयत्ता नववीतील चौघे मित्र धरणगाव येथे केक घेण्यासाठी मोटरसायकल (एम.एच.19 बी.सी.7098) ने जात होती व परतीच्या प्रवासात धरणगावकडून येणार्‍या दुचाकी (एम.एच.19 ए.बी.7098) शी समोरासमोर धडक झाली. अपघातात शेखर जितेंद्र महाजन व गायत्री जितेंद्र महाजन (अनोरे) हे दोघे भाऊ बहिण जखमी झाले तसेच दुचाकीवरील चौघे मित्र जबर जखमी झाले. जखमींना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर जळगावी हलवण्यात आले. प्रथमेश पाटील याचा उपचारादरम्यान मृत्यू ओढवला. दरम्यान, इतर पाच जखमींवर जळगाव येथे उपचार सुरू आहेत.

प्रथमेश हा इयत्ता नववीत शिकत होता. त्याच्या पश्चात लहान बहिण आहे. आई-वडील यांचा तो एकुलता एक मुलगा होता. त्याच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर मोठा आघात झाला.

 


कॉपी करू नका.