मुंबईत एलिफंटा बोर्ट दुर्घटना : 13 जणांचा मृत्यू


मुंबई (18 डिसेंबर 2024) : मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणार्‍या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीची धडकल्याने अपघात घडला होता. ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. या दुर्घटनेत 10 नागरिकांसह नौदलाच्या 3 कर्मचार्‍यांचा मृत्यू झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

13 जणांचा मृत्यू
एलिफंटाजवळ झालेल्या दुर्घटनेबाबत माहिती देताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मुंबईजवळील समुद्रात असलेल्या बुचर बेटांजवळ बुधवारी दुपारी 3.55 वाजता नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला नौदलाच्या एका बोटीने धडक दिली. संध्याकाळी 7.30 पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातामधून आतापर्यंत 101 जणांना सुरक्षितरीत्या वाचवण्यात आलं आहे मात्र या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या 13 लोकांमध्ये 10 नागरिक आणि 3 नौदलाच्या कर्मचार्‍यांचा समावेश आहे. याशिवाय दोन जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांना नौदलाच्या रुग्णालयातच दाखल करण्यात आले.


कॉपी करू नका.