आमदार चंद्रकांत पाटील स्पष्टच म्हणाले ; प्रत्येकाला वाटतं की मीच आजन्म मंत्री असावा, मग नव्यांनी काय करायचं ?
जळगाव (19 डिसेंबर 2024) : मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीवर भाष्य केले आहे. भुजबळ यांची नाराजी हा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे सांगत प्रत्येकाला वाटतं की मीच आजन्म मंत्री असावा, मग नव्यांनी काय करायचं ? असा सवाल उपस्थित केला आहे.
आमदार पाटील पुढे म्हणाले की, आजचा कार्यकर्ता हा उद्याचा राज्यकर्ता होईल हे जे म्हटलं जातं हे खोटं आहे का? त्यामुळे नवीन लोकांना देखील संधी देऊन त्यांचे व्हिजन त्यांच्या विकासाचा मुद्दा आहे, यावर काम झाले पाहिजे. ही सर्व समाजाची आणि कार्यकर्त्यांची मागणी आहे.
त्यामुळे छगन भुजबळ यांना काय वाटतं हे मला माहित नाही. प्रत्येकाला असं वाटतंय की मी आजन्म मंत्री असावे. मग नवीन येणार्यांनी काय करायचं, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या मनातील खदखद बोलून दाखवली.
मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलण्यात आले. यामुळे त्यांनी जाहीरपणे त्यांचे असंतोष व्यक्त करत जहाँ नहीं चैना वहा नहीं रहना असा सूचक वक्तव्य केले. आता यावर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला आहे.