धुळे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : वास्तव्य लपवून धुळ्यातील राहणार्या चौघा बांगलादेशी नागरिकांना अटक
धुळे (23 डिसेंबर 2024) : धुळे गुन्हे शाखेने शहरातील एका लॉजमध्ये वास्तव्य लपवून राहणार्या चौघा बांगलादेशी नागरिकांना अटक केली. संशयीतांकडे दिल्ली, मुंबई, बंगळूरातील पत्त्याचे बनावट आधार कार्ड मिळाले असून ते जप्त करण्यात आले.
या संशयीतांना अटक
महंमद मेहताब बिलाल शेख (48), शिल्पी बेगम महंमद बेताब शेख (43, रा.मानकुर इंदिरानगर, हाऊस नं.185, ग.नं.3, मुंबई मूळ रा. चरकंदी पो.निलुखी पोलीस ठाणे, सिपचर, जि.महिदीपुर, बांगलादेश), ब्युटी बेगम पोलस शेख (45, रा.ग.नं.ए/55, पलकपुर, दिल्ली, मुळ रा.बेहेनातोला पोलीस ठाणे सिपचर, जि.महिदीपुर, बांगलादेश) व रिपा रफीक शेख (वय 30 रा.302, कबीर वस्ती, रोशन वाली गल्ली, दिल्ली मुळ रा.श्रीकृष्णादी पो. कबीरस्पुर पोलीस ठाणे, राजुर जि. महिदीपुर, बांगलादेश) अशी चौघांची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळ्यातील न्यु शेरेपंजाब लॉजधुमधील रूम नं.122 मध्ये वैध कागदपत्राशिवाय काहीजण बेकायदेशिररित्या राहत असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना रविवार, 22 रोजी मिळाली. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सुचनेनंतर एलसीबीचे पथक, दहशतवाद विरोधी पथक व दामिनी पथकाने न्यु शेरेपंजाब लॉजमधील रुम नं.122 मधील चौघांना ताब्यात घेतले. चौकशीत महंमद शेख व शिल्पी बेगम यांनी आम्ही पती-पत्नी व दुसरी महिला ही मुबोली बहिणी असून चारही बांगलादेशी असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून 40 हजाराचे चार मोबाईल ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे बांगलादेशी असल्याचे कोणतेही वैध पासपोर्ट व व्हिसा आढळुन आला नाही. संशयीत नातेवाईकांशी बोलण्याकरिता आयएमओ हे अॅप वापरत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी एलसीबीचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पाटील यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, एपीआय श्रीकृष्ण पारधी, प्रकाश पाटील, मुकेश पवार, शशिकांत देवरे, हेमंत पाटील, धमेंद्र मोहिते, सुशील शेंडे, निलेश पोतदार, विनायक खैरनार, किशोर पाटील, ए.टी.एस.चे रफीक पठाण, दामिनी पथकाचे महिला धनश्री मोरे, आझादनगर पोलीस ठाण्याच्या महिला कर्मचारी राजश्री पाटील, बेबी मोरे व वंदना कासवे यांनी केली आहे. दरम्यान, संशयीत बांगलादेशातील बेरोजगारीला कंटाळून देशात रोजगाराच्या शोधात आल्याचे त्यांनी सांगितले.