भुसावळातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाचे उद्यापासून स्नेहसंमेलन


भुसावळ (25 डिसेंबर 2024) : भुसावळ शहरातील श्री सरस्वती विद्या प्रसारक मंडळ संचलित श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन ‘उमंग 2024-25’ चे आयोजन गुरुवार, 26 ते शनिवार, 28 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.

विविध कार्यक्रमांची मेजवानी
तीन दिवसीय महोत्सवात मैदानी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, कला प्रदर्शन, पारितोषिक वितरण आदी कार्यक्रम होतील. पहिल्या दिवशी मैदानी स्पर्धांचे उद्घाटन राजेश सुराणा, डॉ.संदीप जैन यांच्या उपस्थितीत होईल. दुसर्‍या दिवशी स्नेह संमेलन आणि ‘पद्म आर्ट गॅलरी’ उद्घाटन पद्मा मोतीलाल कोटेचा यांच्याहस्ते होईल. सांस्कृतिक कार्यक्रमांचे उद्घाटन वीणा लाहोटी यांच्याहस्ते होईल. ललिता चोरडिया, डॉ.ममता संदीप जैन, अनिता संघवी, सीए सीमा अग्रवाल यांची उपस्थिती असेल.

सांस्कृतिक कार्यक्रमांत विद्यार्थी नृत्य, गायन, नाटक, मिमिक्री सादर करतील. तिसर्‍या दिवशी पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी पद्मा मोतीलाल कोटेचा असतील. प्रमुख वक्ते डॉ.स्वप्नील चौधरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. उपप्राचार्य डॉ.जान्हवी तळेगावकर, उपप्राचार्य डॉ.शरद अग्रवाल, पर्यवेक्षक प्रा.अर्चना झिंगरन, स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.के.सी.सूर्यवंशी, प्रा.श्वेता नागला, स्नेहसंमेलन सचिव ज्योती प्रभाकर सावकारे, जास्मीन राजू तडवी विशेष परिश्रम घेत आहेत.


कॉपी करू नका.