भुसावळातील माहिती अधिकार कार्यकर्त्याची दुचाकी लांबवली
भुसावळ (26 डिसेंबर 2024) : शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ता केदारनाथ वामन सानप यांच्या घराबाहेरून चोरट्यांनी 60 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. ही घटना 22 रोजी मध्यरात्रीनंतर घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
केदारनाथ सानप यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार, 22 रोजी घराबाहेर सुझूकी अॅक्सेस दुचाकी (एम.एच.19 ईई 1673) ही घराबाहेर उभी केल्यानंतर मध्यरात्री चोरट्यांनी संधी साधली. सर्वत्र शोध घेवूनही दुचाकीचा तपास न लागल्याने अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.