भुसावळात अवैध वाळू वाहतूक : गुन्हे शाखेने डंपर पकडत चालकाविरोधात दाखल केला गुन्हा


भुसावळ (26 डिसेंबर 2024) : भुसावळ शहरातील नाहाटा चौफुलीजवळ मंगळवारी पहाटे 1.30 वाजता अवैधरित्या वाळू वाहतूक करणार्‍या डंपरवर गुन्हे शाखेने कारवाई करीत डंपर बाजारपेठ पोलिसात जमा करीत चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.

काय घडले नेमके ?
मंगळवारी पहाटे 1.30 वाजता एलसीबीचे पोलीस कर्मचारी गस्तीवर असतांना नहाटा चौफुलीजवळ विना क्रमांकाचा डंपर आल्यानंतर कर्मचारी संदीप पोळ यांनी डंपर थांबवित कागदपत्रांची मागणी केली असता गिरीष सानप (रा.जळगाव) यांने कागदपत्रे सादर केली नाही. वाळू वाहतुकीचा कुठलाही परवाना नसतांना वाळूची वाहतूक अवैधरित्या वाहतूक होत असल्याने तसेच डंपरवर क्रमांक नसल्याने पोळ यांनी डंपर जप्त करून बाजारपेठ पोलिसात जमा करीत चालक सानपविरूध्द गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ यांनी संशयीत सानपला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.


कॉपी करू नका.