आयआरसीटीसीची वेबसाईट झाली ठप्प : सुटीचे नियोजन करणार्‍या प्रवाशांना मनस्ताप


IRCTC website down नवी दिल्ली (25 डिसेंबर 2024) : आयआरसीटीसीची वेबसाईट ठप्प झाल्याने प्रवासी वैतागले आहेत. गुरुवार, 26 रोजी आयआरसीटीसीची वेबसाइट आणि मोबाइल अ‍ॅप ठप्प झाले असून रेल्वे तिकिटांचे बुकिंग करता येत नसल्याने प्रवाशांचा मनस्ताप वाढला आहे. थर्टीफस्टच्या नियोजनासाठी अनेकांनी बाहेरगावी जाण्याचे प्लॅनिंग केले मात्र वेबसाईट सुरू होत नसल्याने मनस्ताप वाढला आहे.

मेन्टनन्स कामाची अडचण
सूत्रांच्या माहितीनुसार, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळीच आयआरसीटीसी वेबसाइट ठप्प झाली. रेल्वे तिकीट प्लॅटफॉर्मवर दिलेल्या माहितीनुसार, देखभाल कार्यामुळे म्हणजेच मेंटनेंस अ‍ॅक्टिव्हिटीमुळे सध्या या प्लॅटफॉर्मवर अ‍ॅक्सेस करता येत नाही, असे मेसेज येत आहे. दरम्यान, याबाबत अनेक युजर्सनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली.

 


कॉपी करू नका.