लोखंडी सळई पुरवण्याच्या नावाखाली भुसावळ शहरातील रेल्वे ठेकेदाराला 40 लाखात गंडवले


A railway contractor in Bhusawal city was duped of Rs 40 lakhs under the pretext of supplying iron rods. भुसावळ (25 डिसेंबर 2024) : स्टील अ‍ॅथरटी ऑफ इंडियाचा कर्मचारी असल्याचे भासवून भुसावळातील रेल्वे ठेकेदाराला 40 लाखांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशयीत श्रीकांत मिश्रा विरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण
श्रीकांत मिश्रा याने स्टील अ‍ॅथरटी ऑफ इंडियाचा कर्मचारी असल्याचे भासवून  शहरातील एका कंत्राटदाराकडून लोखंडी सळईचा माल पुरवतो म्हणून वेळोवेळी ऑनलाईन एनएफटीद्वारे पैसे घेऊन तब्बल 40 लाख 96 हजार 920 रुपये घेतले. परंतु मनवानी यांना लोखंडी सळईचा माल न देता आणखी पैशांची मागणी केल्यामुळे शेवटी त्यांनी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे करीत आहेत.


कॉपी करू नका.