भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांचे निधन


नवी दिल्ली (26 डिसेंबर 2024) : भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक मनमोहन सिंह यांचे गुरुवारी रात्री दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. मनमोहन सिंह हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. आता त्यांचं निधन झालं आहे.

33 वर्ष विद्वान खासदार
मनमोहन सिंग 33 वर्षे खासदार होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिले जायचे. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते, जे 10 वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले. 2004 ते 2014 असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते तसेच 1998 ते 2004 या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते.

33 वर्षांपूर्वी म्हणजे 1991 साली डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्यसभेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. चार महिन्यातच त्यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली.

1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. त्यांनी खासगीकरण-उदारीकरण आणि जागतिकीकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली.


कॉपी करू नका.