मुक्ताईनगर नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकणार ! पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचा आशावाद


मुक्ताईनगर (30 नोव्हेंबर 2025) : भाजपा हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे आम्ही मंत्रीपदापर्यंत पोहोचलो आहोत. कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभे राहणे हे स्व.गोपीनाथ मुंडे व भाजपाचे संस्कार असल्याचे पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी येथे सांगत नगरपंचायत निवडणुकीतील भाजपाच्या सर्व उमेदवारांना अधिकाधिक मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले. जेडीसीसी बँकेजवळ रविवार, 30 रोजी दुपारी त्यांची जाहीर सभा झाली. यावेळी त्या बोलत होत्या.

भाजपामुळेच मुक्ताईनगराचा विकास
पर्यावरण मंत्री.पंकजा मुंडे यांनी पंतप्रधानांच्या कल्याणकारी योजनांची माहिती देत भाजपामुळे मुक्ताईनगरचा विकास झाल्याचे सांगितले. मंत्री रक्षा खडसे यांच्या कार्याचा त्यांनी यावेळी विशेष गौरव केला व भाजपाचा उमेदवारांचा निश्चितपणे येथे विजय होईल, असा आशावादही यावेळी व्यक्त केला.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, डॉ.राजेंद्र फडके, नंदकिशोर महाजन, अशोक कांडेलकर, डॉ.केतकी पाटील, मधुकर राणे, तालुकाध्यक्ष जयपाल बोदडे, नजमा तडवी, मोहन महाजन, असगर खान पठाण, मनोहर खैरनार, विनोद पाटील, राजेंद्र सवळे, चंद्रकांत भोलाणे, अतुल महाजन, पंकज कोळी, उमेश कोळी यांच्यासह भाजपा पदाधिकारी व परिसरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !