धाराशिवमध्ये सरपंचाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न


धाराशीव (27 डिसेंबर 2024) : सरपंच हत्येचे प्रकरण गाजत असतानाच आता धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यात गुरुवारी सरपंच असणार्‍या नामदेव निकम यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा संशय निकम यांनी व्यक्त केला आहे.

काय घडले नेमके
नामदेव निकम हे मेसाई जवळगा गावचे सरपंच आहेत. ते भावासोबत आपल्या गावी जात असताना त्यांच्या कारच्या काचा फोडत पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला आहे. या हल्यात ते थोडक्यात बचावले. मध्यरात्री एकच्या सुमारास बारुळ गावाजवळ ही घटना घडली.

नामदेव निकम म्हणाले की, हा हल्ला पवनचक्कीच्या वादातून झाला असावा, असा माझा संशय आहे. असे सुरु राहिल्यास आम्ही काम कसे करणार? मला पोलिसांनी सुरक्षा दिल्यास बरे होईल, असे नामदेव निकम यांनी सांगितले.
मेसाई जवळगावचे सरपंच नामदेव निकम हे मध्यरात्री बारुळकडून आपल्या गावाकडे निघाले होते. यावेळी त्यांचा भाऊही त्यांच्यासोबत होता. तेव्हा अचानक त्यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. दगडांनी गाडीच्या काच्या फोडण्यात आल्या. तर पेट्रोल टाकून गोडी पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यात निकम थोडक्यात बचावले.


कॉपी करू नका.