कन्हाळा येथे महादेव मंदिराची दानपेटी फोडली


भुसावळ (28 डिसेंबर 2024) :  भुसावळ तालुक्यातील कन्हाळा येथील महादेव मंदिरात चोरट्यांनी प्रवेश करीत दानपेटीचे कुलूप तोडून पाचशे ते सहाशे रुपये रुपयांची चिल्लर लांबवली. ही घटना बुधवार, 25 रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले नेमके ?
कन्हाळेतील महादेव मंदिराचे पूजारी कैलास धना भारती (कन्हाळे बुद्रूक) यांच्या फिर्यादीनुसार, चोरट्यांनी 25 रोजी रात्री 12.20 ते 12.26 दरम्यान मंदिराचे कुलूप तोडून दानपेटीतील 500 ते 600 रुपयांची रोकड लांबवली. दुसर्‍या दिवशी पहाटे गुरुवारी मंदिरात पूजारी आल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आला. तपास पोलीस नाईक सुधीर विसपुते करीत आहेत.

 












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !