राज्यातील नऊ आयपीएस अधिकार्यांना पदोन्नती
Nine IPS officers in the state promoted मुंबई (3 जानेवारी 2025) : राज्यातील नऊ आयपीएस अधिकार्यांना पदोन्नती मिळाली असून तयात जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांचाही समावेश आहे. गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी या संदर्भातील आदेश काढले आहेत.
या अधिकार्यांना पपदोन्नती
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्यासह अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त कृष्णकांत उपाध्याय, उपायुक्त प्रवीण मुंढे, पुणे शस्त्र निरीक्षण शाखा पोलीस अधीक्षक तेजस्वी बाळासाहेब सातपुते, नांदेड नागरी हक्क संरक्षणचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार, बृहन्मुंबईचे उपआयुक्त डी. ए. गेडाम, पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञात व परिवहन विभाग पुणे पोलीस अधीक्षक राजा. आर., पोलीस प्रशिक्षण केंद्र नानवीज-दौंड प्राचार्य एन.टी.ठाकूर यांचा समावेश आहे.
अधिकार्यांवर शुभेच्छांचा वर्षाव
सर्व पोलीस अधिकार्यांची पदोन्नतीनंतर नेमणूक त्याच ठिकाणी राहणार असून पुढील काळात त्यांची पदोन्नती होऊन इतर ठिकाणी नेमणूक केली जाणार आहे. अधिकार्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.