18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना सोशल मिडिया अकाउंटसाठी पालकांची संमती अनिवार्य
नवी दिल्ली (5 जानेवारी 2025) : हल्ली तरुण पिढी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे, या प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या उपस्थितीने अनेक चिंता निर्माण केल्या आहेत. या चिंतांना दूर करण्यासाठी केंद्र सरकारने 18 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांना सोशल मिडिया अकाउंट सुरु करण्यासाठी पालकांची संमती घेणे अनिवार्य करण्यात आले आहे.
मुलांच्या पालकाची परवानगी अनिवार्य
केंद्र सरकारने डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अॅक्ट 2023 च्या मसुद्याच्या नियमांमध्ये ही महत्त्वपूर्ण तरतूद जोडली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्फॉर्मेशन अॅण्ड टेक्नोलॉजी मंत्रालयाने ही अधिसूचना जाहीर केली आहे 18 फेब्रुवारी 2025 पर्यंत याबाबत निर्णय घेतला जाईल. कायद्यानुसार, मुले आणि अपंग व्यक्तींच्या डेटाचे संरक्षण करण्यासाठी कठोर उपाय केले जाणार आहेत. डेटा फिड्युशियर्स, जे वैयक्तिक डेटा हातळण्याची जबाबदारी सांभाळतात, त्यांना अल्पवयीन मुलांचा डेटा प्रक्रिया करण्यापूर्वी मुलांच्या पालकाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

डिजिटल लॉकरचे टोकन वापरणे आवश्यक
पालकांनी परवानगी देताना सरकारी ओळखपत्र किंवा डिजिटल लॉकरचे टोकन वापरणे आवश्यक आहे. हा नियम मुलांच्या डेटावर लक्ष ठेवण्यासाठी लागू करण्यात आला आहे. युजर्सला डेटा हटवण्याचा आणि डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी कंपन्यांकडून पारदर्शकतेची मागणी करण्याचा अधिकार असेल. डेटाचे उल्लंघन केल्यावर, डेटा फिड्युशियर्सवर 250 कोटी रुपयांना दंड भरावा लागू शकतो.या नियमामुळे 18 वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांचा डेटा सुरक्षित राहील आणि पालकांना त्यांच्या मुलांच्या ऑनलाइन क्रियाकलापांवर नियंत्रण ठेवण्यात मदत होईल.


