वाघझिरी शासकीय माध्यमिक आश्रम शाळेला डीआरएम इती पाण्डेय यांची भेट


भुसावळ (4 जानेवारी 2025) : भुसावळ विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक तसेच मध्य रेल्वे महिला कल्याण संघटन अध्यक्ष इती पाण्डेय यांनी नुकतीच शासकीय माध्यमिक आश्रम शाळा, वाघझिरी येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांशी सविस्तर संवाद साधून त्यांना जीवनातील महत्त्वाच्या मूल्यांबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना संबोधित करताना पाण्डेय यांनी त्यांना जिद्द, मेहनत आणि चिकाटी या त्रिसूत्रीच्या आधारावर यशस्वी जीवन घडविण्याचा कानमंत्र दिला. याशिवाय, शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि कर्मचार्‍यांसाठी विशेष मिष्टान्न भोजनाची व्यवस्था केली होती. विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक वापरासाठी वॉटर बॉटलचे वाटप करण्यात आले.

शाळेचे मुख्याध्यापक किशोर महाजन यांनी प्रास्ताविक केले. डीआरएम पाण्डेय यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. श्रीमती पाण्डेय यांनी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी तसेच संस्थेच्या उन्नतीसाठी विविध उपाययोजनांवर चर्चा केली. कार्यक्रमाला मध्य रेल्वे महिला कल्याण संघटनेच्या सदस्य उपस्थित होत्या.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !