भुसावळात पोलिसांचे कोम्बिंग : 14 गुन्हेगारांची धरपकड ; दोन पसार जाळ्यात


Police Combing Operation in Bhusawal : 14 Criminals Apprehended; Two Absconders Nabbed भुसावळ (12 एप्रिल 2026)  आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भुसावळ उपविभागात पोलिसांकडून विशेष ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले. या मोहिमेत बाजारपेठ पोलिसांनी आर्म अ‍ॅक्ट व चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सराईत 14 गुन्हेगारांविरुद्ध मोठी कारवाई करीत त्यांची झाडाझडती घेतली तर गंभीर गुन्ह्यातील दोन पसार आरोपींना अटक करण्यात यश आले. समीर शहा जब्बार शहा उर्फ डमरु आणि केवल अनिल टाक (दोन्ही रा.भुसावळ) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.

गुन्हेगारी वर्तुळात खळबळ
मोहिमेदरम्यान तपासण्यात आलेल्या आरोपींपैकी रेकॉर्डवरील चार जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली तर कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींवर मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


हीकारवाई विभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल वाघ, सहायक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय नेरकर, कांतीलाल केदारे, महेंद्र पाटील, हर्षल महाजन, जीवन काकडे, चंद्रकांत रायपूरकर, दिलीप कोल्हे, अक्षय कोतकर, अमर अढाळे, जावेद शहा, भूषण चौधरी, प्रशांत सोनार आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !