सोनगीरचे एपीआय दिलीप खेडकर निलंबित
सोनगीर : सोनगीर पोलिस ठाण्याचे एपीआय दिलीप खेडकर यांना नाशिक परीक्षेत्राचे महानिरीक्षक छेरींग दोर्जे यांनी निलंबीत केल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे. महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री धुळे जिल्ह्यात गुरुवारी येत असल्याने बंदोबस्ताच्या पाहणीसाठी दोर्जे हे धुळ्यात आल्यानंतर त्यांनी सोनगीर पोलिस ठाण्याला मंगळवारी भेट दिल्यानंतर अनेक त्रृटी आढळल्या तसेच विविध विभागात अस्वच्छता आढळल्याने तसेच गुन्हे उघडकीस न आल्याने खेडकर यांना निलंबीत करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.