खिर्डीत हजरत सय्यद कादरी शाह बाबा उरूस उत्साहात


खिर्डी (6 जानेवारी 2025) : गावातील सामाजिक एकोप्याचे प्रतीक असलेल्या हजरत सैय्यद कादरी शाह बाबा उरुसानिमित्त भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यावर्षीही मोठ्या उत्सवात उरुस साजरा करण्यात आला. गावात कुराण पठणाचा कार्यक्रम झाला. मान्यवरांच्या हस्ते दर्ग्यावर चादर चढविण्यात आली.

यावेळी गोड पदार्थाचे वाटप करण्यात आले. प्रसंगी खिर्डी परिसारातील अनेक भाविकांनी व गावातील नागरिकांनी कादरी शाह बाबांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी प्रामुख्याने सुन्नी जामा मशिदीचे मुत्वल्ली शेख अस्लम, शेख शब्बीर, शेख सलमान, अकबर खान, शेख गुलाब, शेख फिरोज, इम्रान खाटीक आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.े









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !