खान्देश रनमध्ये स्वाती फालक विजेत्या

भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या 65 धावपटूंचा स्पर्धेत यशस्वी सहभाग


भुसावळ (9 जानेवारी 2025) : जळगाव रनर्स ग्रुपतर्फे राज्यस्तरीय खान्देश रनचे वेगवेगळ्या श्रेणीत आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या 65 धावपटूंनी यशस्वी सहभाग नोंदविला. त्यापैकी 34 धावपटू 21 किमी तर 31 धावपटू 10 किमी गटात यशस्वी ठरले. यात स्वाती फालक यांनी 21 किमी अर्धमॅरेथॉन केवळ दोन तास 39 मिनिटात पूर्ण करून महिलांच्या गटात त्या तृतीय ठरल्या. आयोजकांतर्फे त्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. याप्रसंगी भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशनच्या सर्व धावपटूंनी मोठा जल्लोष केला.

या धावपटूंचा यशस्वी सहभाग
या स्पर्धेत संस्कार प्रवीण पाटील या 15 वर्षीय धावपटूने सलग दुसर्‍या वर्षी 21 किमी धावून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याबद्दल असोसिएशनचे प्रमुख प्रविण फालक, डॉ.तुषार पाटील, डॉ.नीलिमा नेहेते, डॉ.चारुलता पाटील, गणसिंग पाटील, डॉ.प्रवीण वारके यांनी विशेष आनंद व्यक्त केला. याशिवाय उमेश घुले यांनी 21 किलोमीटर केवळ एक तास 46 मिनिटात धावून आपली चमक दाखवून दिली. त्यांच्या पाठोपाठ डॉ.तुषार पाटील यांनी एक तास 50 मिनिटे, युवराज सूर्यवंशी यांनी एक तास 53 मिनिटे, विजय फिरके यांनी एक तास 55 मिनिटे, निलेश पाटील यांनी एक तास 55 मिनिटे, जितेंद्र चौधरी यांनी दोन तास एक मिनिट, छोटू गवळी यांनी दोन तास 9 मिनिटे, राजेंद्र ठाकूर यांनी दोन तास 11 मिनिटे, डॉ.प्रवीण वारके यांनी दोन तास 12 मिनिटात तर मंगेश चंदन यांनी दोन तास 16 मिनिटात 21 किमी धावून आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याशिवाय दिलीप जोनवाल, विद्याधर इंगळे, तेजस चौधरी, ताराचंद खरारे, डॉ.रोहित पाटील, डॉ.निलेश भिरूड, डॉ.महेश फिरके, फिरोज जरीवाला, राहुल चौधरी, डॉ.सुयोग तन्नीरवर या धावपटूंनी देखील 21 किलोमीटरमध्ये आपली वैयक्तिक चांगली कामगिरी केली.


कॉपी करू नका.