भुसावळातील हिंदी महाविद्यालयाच्या रा.से.यो. चे विशेष शीतकालीन शिबिराचा समारोप


भुसावळ (9 जानेवारी 2025) : शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात 1 ते 7 जानेवारीदरम्यान शीतकालीन शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचा समारोप 7 रोजी हिंदी सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष सत्यनारायण गोडियाले यांच्या उपस्थितीत झाला.

यांची होती उपस्थिती
मुख्य अतिथी म्हणून सभापती रमेश नागराणी, अ‍ॅड.एम.डी.तिवारी, कंडारी प्रभारी सरपंच आशालता चौधरी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रमेश जोशी उपस्थित होते. सात दिवसीय शिबिरात शिबिरार्थी यांनी समापन कार्यक्रमात सुंदर गीत प्रस्तुत केले. शिबिरात सकाळच्या सत्रात शिबिरार्थी यांनी श्रमदान केले तसेच दुपारच्या सत्रात बौद्धिक कार्यक्रम झाला. डॉ.अर्चना नेहते यांनी योगमुद्रे विषयी सखोल माहिती दिली तसेच तणावमुक्त जीवन जगावे, असे सांगितले. डॉ.गौरी खानापूरकर यांनी स्वस्थ जीवन शैली विषयी मार्गदर्शन केले. राजीव शर्मा यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असणार्‍या सर्व गुणांचा परिचय करून दिला तसेच डॉ.जगदीश प्रसाद सुचिक यांनी जीवनाचे प्रबंधन कसे करावे याविषयी अनेक उदाहरण देऊन स्पष्ट केले. यशस्वीतेसाठी डॉ.रमेश जोशी, डॉ.सुधीर शर्मा, डॉ.विवेक जोशी, प्रा.ज्योती ओस्तवाल, प्रा.समता तायडे व सर्व प्राध्यापकांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमात मोठ्या संख्येने शिबिरार्थी उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !