भामट्याकडून एटीएम कार्डची अदलाबदली : अमळनेरच्या ईसमाला धुळ्यात 84 हजारांत गंडवले


अमळनेर (10 जानेवारी 2025) : भामट्याने एटीएम कार्डची अदलाबदली करीत अमळनेरच्या प्रौढाला 84 हजारात फसवले. हा प्रकार धुळ्यातील 80 फुटी रोड भागात घडला. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच आझादनगर पोलीस ठाण्यात बुधवारी दुपारी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला. जैनउद्दीन कलंदर पिंजारी (वय 60, आययूडीपी कॉलनी, तांबेपुरा, अमळनेर) यांनी फिर्याद दाखल केली.

काय आहे नेमके प्रकरण ?
जैनउद्दीन हे त्यांचे साडू हिमाम यांच्या घरी लग्न कार्यक्रम असल्याने पत्नीसह धुळ्यात आले होते. पैशांची आवश्यकता असल्याने ते 80 फुटी रोड, भोला बाजार भागातील एटीएम मशीन येथे गेले होते. त्याठिकाणी एटीएम मशीनमधून पैसे निघत नव्हते. त्याचवेळेस तिथे असलेल्या एका अनोळखीने इसमाने ही संधी साधली. बोलत त्या वृध्दाकडून एटीएम कार्ड घेऊन त्याचा पासवर्डदेखील मिळवून घेतला. यानंतर बोलण्यात गुंतवून ठेवत कार्ड बदलून घेत दुसरेच कार्ड त्यांच्या हातात ठेवत अनोळखी इसम तिथून निघून गेला. एटीएम कार्ड आणि पासवर्ड मिळाल्याने सदरहू इसमाने एटीएममधून 84 हजार रुपये परस्पर टप्प्या-टप्प्याने काढून फसवणूक केली. आपल्या खात्यातून पैसे वर्ग झाल्याचे कळताच जैनउद्दीन पिंजारी यांनी आझादनगर पोलीस ठााण्यात गुन्हा दाखल केला. तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भदाणे करीत आहेत.


कॉपी करू नका.