भुसावळातील श्री.र.न.मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात वार्षिक स्नेहसंमेलन
भुसावळ (12 जानेवारी 2025) : शहरातील श्री.र.न.मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. अध्यक्षस्थानी हिंदी सेवा मंडळाच्या महामंत्री श्रीमती मधूलताजी शर्मा होत्या.
यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर मधुलता शर्मा, प्रधानाध्यापिका रीता शर्मा, पालक प्रतिनिधी यास्मीन मोहम्मद नौशाद, प्रीती फर्नांडिस, नॅन्सी मिसाळ, सुमित पाटील, रवींद्र पाटील, हेमंत धांडे, चेतन शर्मा उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीताचे गायन केले. विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर नृत्य सादर केले तसेच शास्त्रीय नृत्य, लावणी, रिमिक्स, नाटिका, एकल नृत्य, गीत गायन यांचा समावेश सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये होता. मधुलता शर्मा यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन वैशाली चौधरी तर आभार उमेश खोडपे यांनी मानले. शस्वीतेसाठी प्रधानाध्यापिका रीता शर्मा तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.






