भुसावळ शहरात शिबिरात 340 दात्यांचे रक्तदान
भुसावळ (12 जानेवारी 2025) : जगतद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानतर्फे 4 ते 19 जानेवारीदरम्यान रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. शहरातील जामनेर रोडवरील धन्वंतरी ब्लड बँकेत शनिवार, 11 रोजी रक्तदान महायज्ञ झाला. शिबिरात 202 दात्यांनी रक्तदान केले तर वरणगावातील शिबिरात 138 दात्यांनी रक्तदान केल्याने एकूण 340 रक्त पिशव्या संकलीत करण्यात आल्या.
यांची होती उपस्थिती
शिबिरासाठी माजी नगरसेवक पिंटू कोठारी, संत गाडगे महाराज आयटीआयचे प्राचार्य संजय शुक्ला, बालरोग तज्ज्ञ डॉ.मीनाक्षी महाजन, स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.जानवी पाटील, अॅड.तुषार पाटील, अॅड.कैलास लोखंडे, नगरसेवक दिनेश अरुण नेमाडे आदींची उपस्थिती होती. भुसावळ तालुका सेवा समिती स्व – स्वरूप संप्रदाय भक्त-शिष्य-साधकांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.






