रेल्वे तिकीट तपासणीचा प्रामाणिकपणा : प्रवाशाचे पाकीट केले परत


भुसावळ (12 जानेवारी 2025)  : प्रामाणिकपणा लोप पावत चालल्याच्या भलेही कितीही वल्गना होत असल्यातरी रेल्वे तिकीट तपासणीसाने मात्र या वल्गनेला छेद देत रेल्वे प्रवासात हरवलेले प्रवाशाचे पाकिट परत करीत प्रामाणिकपणा जिवंत असल्याचा प्रत्यय दिला.

काय घडले नेमके ?
झाले असे की, भुसावळातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य व ललवानी फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिलीपकुमार ललवाणी हे ठाण्याहून भुसावळ येण्यासाठी 12141 पाटलीपुत्र एक्सप्रेसच्या बी 1 बोगीतील 68 नंबरच्या सीटवरून प्रवास करीत होते मात्र घाईघाईत ते भुसावळ आल्यानंतर बर्थवर सात हजारांची रोकड, पॅन कार्ड, आधार कार्ड, बँकेचे एटीएम व काही महत्त्वाची कागदपत्रे असलेले पाकीट विसरले. गाडीतील टीटीआय सुजित कुमार यांना तपासणीदरम्यान हे पाकिट नजरेस पडताच त्यांनी प्रवाशांसमक्ष रक्कम व कागदपत्रांची नोंद कली. सुजीतकुमार यांनी कागदपत्रांच्या आधारे प्रा.ललवाणी यांच्याशी मोबाईलवरुन संपर्क साधत पाकिट सापडल्याची कल्पना देत भुसावळ कार्यालयात कळवले. भुसावळात हेड टीसी ऑफिसमध्ये ललवाणी यांना बोलावून इन्चार्ज रत्नेश तिवारी व सहकारी टीटीआय के.बी.राठवा यांच्या समक्ष ते पाकीट त्यांना सुपूर्द केले. प्रा.ललवाणी यांनी बक्षीस रक्कम देवू केल्यानंतर सुजित कुमार यांनी नप्रपणे नकार देत हे आमचे कर्तव्य असल्याचे सांगितले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !