भुसावळातील आपले परिवार सार्वजनिक वाचनालयाचा प्रगल्भ वाचक घडवण्याचा उपक्रम


भुसावळ (12 जानेवारी 2025) : वांजोळा रोडवरील आपले परिवार सार्वजनिक वाचनालयात ‘वाचन संकल्प महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत 1 ते 30 जानेवारीपर्यंत वाचन संस्कृती अभियान राबविण्यात येत आहे. सकाळी 7 ते 11 या वेळात निशुल्क सर्वांसाठी प्रवेश असून वाचन हे मूलभूत कौशल्य-शालेय विद्यार्थ्यांना रुजवून – का वाचावे ? कसे वाचावे ? काय वाचावे ? वाचन वेग कसा वाढवावा याबाबत मार्गदर्शन करून नियमित वाचनाच्या सरावातून प्रगल्भ वाचक घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

11 रोजी महाराणा प्रताप विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थी व शिक्षक व शिक्षिकांनी वाचनालय परिसरात येऊन पुस्तक प्रदर्शन, दैनिक वृत्तपत्र कात्रण संग्रह प्रदर्शनाची कुतूहलपूर्वक पाहणी केली. विद्यार्थ्यांनी वाचनालय परिसरातील सुविचार म्हणी यांचे वहीत लिखाण करून घेतले. वाचनालयातील काही पुस्तकांचे सामूहिक वाचन केले. वैभव पुराणिक, आशिष सैतवाल, सुधीर भोळे, सुरेखा चौधरी व वंदना ठोके यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक सुरेश कुलकर्णी होते.

छगन लढे, भागवत भारंबे इत्यादी जणांनी मार्गदर्शन केले. शिक्षक व शिक्षिका यांचा पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. वाचन प्रतिज्ञा ही आशिष सैतवाल यांनी म्हटली. ‘मी पाहिलेले वाचनालय’ या विषयावर निबंध स्पर्धा घेऊन या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस दिले जाणार असल्याचे वाचनालयाचे समन्वयक शांताराम पाटील कळवतात.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !