भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाऊ जयंती


भुसावळ (12 जानेवारी 2025)  : राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून शहरातील के.नारखेडे विद्यालयात स्वामी विवेकानंद जयंती तसेच राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यालयाचे मुख्याध्यापक वाय.एन.झोपे यांच्याहस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस माल्यार्पण व अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी विद्यालयाच्या पर्यवेक्षिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक एस.एल.राणे, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, शिक्षक एस.पी.पाठक, एस.एम.चिपळूणकर, सी.बी.जोगी व विद्यालयातील इतर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !