भुसावळातील डी.एल.हिंदी महाविद्यालयात स्वामी विवेकानंद आणि माता जिजाऊ जयंती


भुसावळ (12 जानेवारी 2025) : श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात रविवार, 12 जानेवारी हा दिवस युवक दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या दिवसाचे अवचित्य साधुन स्वामी विवेकानंद व माता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. रमेश जोशी यांच्याहस्ते करण्यात आले.

डॉ.रमेश जोशी यांनी युवकांनी स्वामी विवेकानंद यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनात ज्ञानयोग, भक्तीयोग, कर्मयोगाद्वारे अध्यात्मिक व व्यावहारिक ज्ञान मिळवावे, असे सांगितले. माता जिजाऊने जी प्रेरणा छत्रपती शिवाजी राजे यांना दिली त्याबद्दल सविस्तर माहिती त्यांनी दिली. डॉ.प्रवीण जाधव, अरुण कुडेकर, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही पुष्प अर्पण केले. विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !