माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम सीबीआयच्या जाळ्यात
नवी दिल्ली : तब्बल 27 तास सीबीआय आणि ईडीला गुंगारा देण्यात यशस्वी झालेले ‘बेपत्ता’ पी.चिदंबरम यांना बुधवारी रात्री अटक करण्यात आली. आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. राजधानी दिल्लीत तब्बल दोन तास त्यांच्या अटकेचं नाट्य रंगलं. ‘कानून के हाथ बहोत लंबे होते है…’ या फिल्मी डायलॉगची प्रचिती पुन्हा एकदा आली. तब्बल 28 तास सीबीआय आणि ईडी अशा सरकारी तपास यंत्रणांना गुंगारा देणारे माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना बुधवारी रात्री नाट्यमय घडामोडीनंतर अखेर अटक करण्यात आली. कायद्यासमोर सगळे समान असतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.