मळगाव पाटचारी संदर्भात मळगावच्या शेतकर्यांचे आमदार मंगेश चव्हाण यांना निवेदन
वंचितांना मळगाव पाटचारीचा लाभ मिळण्यासंदर्भात निवेदन
भडगाव (17 मार्च 2026) : चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांची मळगाव पाटचारी , वरखेडे लोंढे बॅरेज संदर्भात मळगाव येथील ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्यांनी व शेतकर्यांनी भेट घेत चर्चा केली.
मळगाव गाव हे अंदाजे 700 हेक्टर जमिनीवर असून त्या पैकी 231 हेक्टर जमीन ओलीताखाली जात आहे. मळगाव शिवार पूर्ण ओलिताखाली यावे यासाठी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांना निवेदन मळगाव ग्रामपंचायतीसह शेतकर्यांनी 15 रोजी दिले आहे.



