दुकान चालु रखनी है तो मुझे पैसा, दारु देनी पडेगी ; जळगावात चाकूच्या धाकावर धमकावणार्‍याविरोधात गुन्हा


जळगाव (14 जानेवारी 2025) : कमरेला लावलेला चाकू बाहेर काढुन अगर तुमको दुकान चालु रखनी है तो मुझे पैसा, दारु की बॉटल देनी पडेगी असे म्हणत संशयिताने दारुचा एक हाफसह दोन कॉटर असा मुद्देमाल पैसे न देता जबरीने नेला. ही घटना रविवार, 12 रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास आकाशवाणी चौक ते ईच्छादेवी चौक दरम्यान अशोका वाईनशॉपमध्ये घडली.

काय घडले नेमके
राजेश साधुराम कार्डा (42, रा.आनंदनगर, भुसावळ) हे खाजगी नोकरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. राजेश यांच्या तक्रारीनुसार, रविवारी रात्री ते अशोका वाईनशॉप दुकानात कार्यरत होते. रात्रीच्या सुमारास रिजवान गयासोद्दीन शेख उर्फ काल्या (रा.तांबापुरा) हा वाईन शॉपवर आला. कमरेला लावलेला चाकु बाहेर काढत दाखवून त्याने राजेश यांना धमकाविले. शिवीगाळ करत तो म्हणाला, अगर तुमको दुकान चालु रखनी है, तो मुझे पैसा, दारु की बॉटल देनी पडेगी, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर राजेश यांच्याकडुन त्याने या शॉपमधुन दारुचा एक हाफ पॉईंट, दोन कॉटर पैसे न देता घेता घेवून गेला. या प्रकरणी तक्रारीनुसार जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम देशमुख हे करीत आहेत.


कॉपी करू नका.
WhatsApp Group