भुसावळातील जय गणेश फाऊंडेशनतर्फे मोफत पतंग वितरण


भुसावळ (14 जानेवारी 2025) : मकर संक्रांतीच्या निमित्ताने भुसावळ येथील जय गणेश फाऊंडेशनतर्फे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या संकल्पनेतून अध्यक्ष राजेंद्र यावलकर आणि समन्वयक गणेश फेगडे यांच्याहस्ते बाल गोपालांना पतंगांचे वाटप करण्यात आले.

व्यासपीठावर अध्यक्ष राजेंद्र यावलकर, समन्वयक गणेश फेगडे, सचिव तुकाराम आटाळे, तुषार झांबरे, प्रकल्प प्रमुख हर्षल वानखेडे, सह प्रकल्पप्रमुख सुमित यावलकर उपस्थित होते. सुरभी नगरातील नवसाचा गणपती मैदानावर झालेल्या ह्या कार्यक्रमात सुमारे 900 पतंगांचे वाटप करण्यात आले. यावेळी नायलॉन मांजा न वापरणे तसेच वाहतुकीला अडथळा येणार नाही, अशा पद्धतीने पतंग उडविण्याबाबत आवाहन करण्यात आले.

जय गणेश फाऊंडेशनचे पदाधिकारी नचिकेत यावलकर, हर्षल वानखेडे, प्रवीण पाटील, कृष्णा मराठे, प्रभाकर चौधरी, निलेश कोलते, मनोज चौधरी, राहुल भावसेकर, पार्थ चौधरी यांनी नियोजन व प्रयत्न केले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !