मुंबई तुंबली : अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल


मुंबई : मुसळधार पाऊस सुरू असल्याने शिवाय रेल्वे रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने अनेक लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या असून मुंबईतील उपनगरीय वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतानाच रेल्वे प्रशासनाने लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्याही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

या रेल्वे गाड्या झाल्या रद्द
रद्द गाड्यांमध्ये मुंबई-मनमाड पंचवटी एक्सप्रेस, मुंबई- मनमाड राज्यराणी एक्सप्रेस, मनमाड-एलटीटी एक्सप्रेस, मुंबई-शिर्डी साईनगर एक्सप्रेस, पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, पुणे-मुंबई डेक्कन क्वीन, मुंबई – सोलापूर सिद्धेश्वर एक्सप्रेस, मुंबई- चेन्नई मेल, मुंबई – भुसावळ पॅसेंजर, मुंबई- कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस, भुसावळ-पुणे एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

अनेक रेल्वे गाड्या खोळंबल्या
मुसळधार पावसामुळे मुबई-पुणे रेल्वे वाहतूक, तसचे नाशिक- मुंबई रेल्वे वाहतूकही पूर्णपणे बंद असून अनेक ठिकाणी लांबपल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या आहेत. नागपूर -सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेसही इगतपुरीत खोळंबली आहे. या बरोबरच मुसळधार पावसामुळे कसारा घाटात रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे. मुसळधार पावसामुळे मुबई-पुणे रेल्वे वाहतूक, तसचे नाशिक- मुंबई रेल्वे वाहतूकही पूर्णपणे बंद आहे. अनेक ठिकाणी लांबपल्ल्याच्या गाड्या खोळंबल्या असल्याचे वृत्त आहे. नागपूर-सीएसएमटी दुरांतो एक्स्प्रेसही इगतपुरीत खोळंबली आहे. या बरोबरच मुसळधार पावसामुळे कसारा घाटात रेल्वे रुळांवर पाणी साचले आहे.


कॉपी करू नका.