धुळे तालुक्यातील तरुणाचा गोळी घालून खून : आरोपींना अटक

चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनसह गुन्हे शाखेची कामगिरी


Youth shot dead in Dhule taluka : Accused arrested चाळीसगाव (4 जुलै 2025) : चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात संशयास्पद मृतदेह आढळला होता. चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी
केवळ 12 तासांत मृतदेहाची ओळख पटवून दोन आरोपींना अटक केली. जगदीश जुलाल ठाकरे (42 रा.मोरदड, ता.जि.धुळे) असे खून झालेल्या प्रौढाचे नाव आहे. आरोपींनी मृताचे अपहरण करून त्याचा गोळी झाडून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.

खून करून मृतदेह फेकला
कन्नड घाटात एक अनोळखी पुरुष जातीचे मृतदेह 29 जून रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिसांनी मृताच्या अंगावरील वस्तू आणि खुणा यांच्या आधारे सोशल मीडियावर माहिती प्रसारित करून मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न केल्यानंतर मृताची ओळख पटली व मृत हरवल्याबाबत धुळे तालुका पोलिसात हरवल्याची नोंद असल्याचे स्पष्ट झाले.

पत्नीच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा
मृताची पत्नी अरुणा जगदीश ठाकरे यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात फिर्याद देत मोरदड गावातील शुभम सावंत, अशोक मराठे व एका अनोळखी तरुणाने वाढदिवसाला नेण्याचे कारण सांगून त्यांना घरातून बाहेर नेले व त्यानंतर खून करून मृतदेह कन्नड घाटात फेकून दिल्याची तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला व आरोपींना अटक करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप पाटील तसेच चाळीसगाव ग्रामीणचे पोलिस निरीक्षक राहुलकुमार पवार, उपनिरीक्षक प्रदीप शेवाळे, उपनिरीक्षक राहुल राजपूत, स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शेखर डोमाळे, कॉन्स्टेबल महेश पाटील, भूषण शेलार व चालक बाबासाहेब पाटील यांनी केली. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते करीत आहेत.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !