दिव्यांग बांधवांना साहित्य वितरणासह पत्रकारांचा सन्मान

पिंपरूडला दिव्यांग व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम


फैजपूर (15 जानेवारी 2025) : जवळच असलेल्या पिंपरूड येथे दिव्यांग व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या (राहुल कोल्हे सामाजिक मित्र परिवार) वतीने दरवर्षाप्रमाणे सोमवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करीत दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर, स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्ताने घेण्यात आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना प्रांताधिकारी व तहसीलदारांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. संस्थेच्या वतीने विविध दिव्यांग बांधवांना साहित्यदेखील वितरण करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी बबनराव काकडे होते. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे, तलाठी श्वेता ससाने, ग्रामसेवक बाळू वायकोळे, पोलीस पाटील हरीष चौधरी यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फैजपूर येथील निवासी मतिमंद विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमात अशोक पाटील व भुषण पाटील यांच्या माध्यमातून व दिव्यांग संस्थेच्या वतीने दिव्यांग बांधवांना त्यांच्या गरजेनुसार साहित्य वाटप करण्यात आले. पत्रकार दिनानिमित्त पत्रकार बंधुचा सन्मान चिन्ह, शाल, पेन, वही, व पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.

यांचा झाला सन्मान
पत्रकार वासुदेव सरोदे, उमाकांत पाटील, समीर तडवी, फारुख शेख, सलीम पिंजारी, निलेश पाटील, मलक शकीर, शेखर पटेल, राजू तडवी, मयूर मेढे, ईदू पिंजारी यांना प्रांतधिकारी व तहसीलदारांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. प्रस्तावना मार्गदर्शक राहुल कोल्हे व सूत्रसंचालन दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष योगेश उर्फ मुन्ना चौधरी यांनी केले. आभार संस्थेचे उपाध्यक्ष चेतन तळेले यांनी मानले. यशस्वीतेकरीता सचिव विशाल दांडगे, चिराग पाटील, पराग वारके, सोनू कोळी,संगीता दांडगे, स्वाती कोल्हे यांनी परिश्रम घेतले.

या विद्यार्थ्यांनी मिळवले बक्षीस
फैजपूर येथील निवासी मतीमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक अरविंद पाटील यांच्या नेतृत्वात स्पर्धा घेण्यात आल्या. यात 50 मीटर धावण्यात प्रथम गौरव थोरवे, द्वितीय गोपेश पाटील, स्पॉट जंपमध्ये प्रथम तुषार अभंग, द्वितीय साईराज राजपूत, तीनचाकी सायकल रेसिंग स्पर्धेत प्रथम शेख सोयब, द्वितीय नितीन महाजन, तृतीय विनोद बिर्‍हाडे यांना बक्षीस देण्यात आले. या कार्यक्रमात दिव्यांग साहित्यात कुबड्या, व्हील चेअर, कृत्रीम हात, कृत्रीम पाय व प्रज्ञाचक्षुंकरीता काठी असे साहित्य विलास कोळी, ललित वाघूळदे, दिगंबर कोल्हे, रेखा कोळी, प्रमोद कोळी, बाळु चौधरी यांना देण्यात आले. हस्त कलाकार मुन्ना चौधरी यांनी काचेच्या बॉटलमध्ये लाकडी बैलगाडी बनवली असून ती मान्यवरांच्या हस्ते लॉन्च करण्यात आली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !