जळगावात अपघात थांबेनात : अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार
Accidents don’t stop in Jalgaon : Biker killed after being hit by unknown vehicle जळगाव (16 जानेवारी 2025) : शहरात सातत्याने अपघातांची मालिका कायम आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार भारमल कौतीक पाटील (62, वैजनाथ, ता.एरंडोल) हे ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी शहरातील पिंप्राळा उड्डाणपुलावर घडली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
काय आहे नेमकी घटना ?
आयुर्वेदिक उपचारासाठी भारमल पाटील हे दुचाकी क्रमांक (एम.एच. 19 बी.डब्ल्यू.2730) ने शहरात येत असताना शिवकॉलनी जवळील रेल्वे उड्डाणपुलावर अवजड ट्रकने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.
या अपघातात दुचाकीस्वार पाटील हे वाहनाच्या अवजड वाहनाच्या चाकाखाली आल्याने चिरडले गेल्याने जागीच ठार झाले. ही घटना घडल्यानंतर पाळधी महामार्गचे पोलीस उपनिरीक्षक मो.वली सैय्यद यांच्यासह जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयताच्या पश्चात पत्नी व तीन मुली असा परिवार आहे. दरम्यान मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्याचे काम सुरू होते.