भुसावळ शहरातील के.नारखेडे विद्यालयात वार्षिक क्रीडा स्पर्धा


भुसावळ (16 जानेवारी 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात दोन दिवसीय क्रीडा स्पर्धांचे नुकतेच मान्यवरांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्था सेक्रेटरी पी.व्ही. पाटील होते.

यांची होती उपस्थिती
प्रमुख अतिथी म्हणून शहर पोलीस स्टेशन भुसावळ शहरचे सहा.निरीक्षक राहुल भंडारी, ऑननरी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सदस्य विकास पाचपांडे. मुख्याध्यापक एन.बी.किरंगे, प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन. झोपे, पर्यवेक्षक संगीता अडकमोल, पर्यवेक्षक सुनील राणे, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील यांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ देण्यात आली. क्रीडा खेळाडू भाग्यश्री चौधरी, खुशबू तायडे, संमेक्ष पडाले, अनन्या काळे, पौरवी गरुडे यांनी मैदानात क्रीडा मशाल ज्योत फिरविली. अध्यक्ष पी.व्ही.पाटील यांनी विद्यार्थ्यांना खिलाडू वृत्तीने खेळण्याचा संदेश दिला.

क्रीडा प्रमुख निलेश नेहेते, पी.आर.सपकाळे, मनोज तडवी, नवीन नेमाडे, विनोद सोनवणे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या स्पर्धांमध्ये बुद्धिबळ, कबड्डी या प्रकारच्या स्पर्धा यांचा समावेश होता. खेळांचे समालोचन शिक्षक सुनील पाठक व शैलेंद्र वासकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रदीप सपकाळे यांनी तर आभार मनोज तडवी यांनी मानले. या क्रीडा महोत्सवासाठी सर्व क्रीडा शिक्षक, संगणक विभाग व विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !