पत्रकार दिननिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
फैजपूर (17 जानेवारी 2025) : मराठी पत्रकार सृष्टीचे जनक, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त न्हावी येथील जि.प.मराठी मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पत्रकार दिनानिमित्त शालेय साहित्य वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी तंत्र व वैद्य शिक्षक मंडळाचे अध्यक्ष शरद महाजन होते. मान्यवरांचा पत्रकारांकडून शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
शरद महाजन यांनी लोकशाही बळकट ठेवण्यासाठी प्रसारमाध्यमांची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी सुद्धा अभ्यासात सातत्य ठेवून नेहमी वाचन करून भविष्यात आपले ध्येय निश्चित करावे, असेही ते म्हणाले. लोकनियुक्त सरपंच देवेंद्र चोपडे, जिल्हा दूध संघाचे संचालक नितीन चौधरी, मुख्याध्यापिका मीना तडवी, स्वप्ना तायडे, जि.प.मराठी मुलींच्या शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, बिपीन कुमार वैद्य, राजश्री चौधरी, पत्रकार पी.के.चौधरी, संतोष बारी, रवींद्र कोलते, संजय बारी व विद्यार्थी उपस्थित होते. आभार पत्रकार ललित फिरके यांनी मानले.






