कोळन्हावी गावात मजुरीचे पैसे मागितल्याच्या कारणावरून एकास मारहाण


Man beaten up for asking for wages in Kolnhavi village यावल (19 जानेवारी 2025) : यावल तालुक्यातील कोळन्हावी गावाजवळ पुनगाव रोडवर मजुरीचे पैसे मागितल्याच्या रागातून 31 वर्षीय तरुणाला एकाने शिवीगाळ करून मारहाण केली व थेट बियरची बाटली त्याच्या डोक्यात मारून दुखापत केली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात शनिवारी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पैसे मागितल्याच्या वादातून घटना
कोळन्हावी, ता.यावल या गावात पुनगावकडे जाणार्‍या रस्त्यावर किशोर राजेंद्र सोनवणे (31) हा तरुण उभा असताना मजुरीचे पैसे मागितल्याच्या रागातून त्याला प्रदीप उर्फ बबलू बाळू सोळुंके याने शिवीगाळ करून मारहाण केली व बियरची बाटली त्याच्या डोक्यात मारून दुखापत केली व ठार मारून टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील पाटील करीत आहे.


कॉपी करू नका.