चाळीसगावातील चित्रकार, कवी दिनेश चव्हाण यांच्या वैचारिक लेख संग्रहाला उत्कृष्ठ साहित्यकृती पुरस्कार
चाळीसगाव (20 जानेवारी 2025) : शहरातील नामवंत चित्रकार, कवी साहित्यिक दिनेश चव्हाण यांनी रविवार, 19 रोजी तिहेरी यश संपादन केले.
जामनेर येथे झालेल्या 15 व्या खान्देशस्तरीय मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या षबोल हे अंतरीचे’ या वैचारिक लेख संग्रहाला उत्कृष्ठ साहित्यकृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
त्यातच दुसरा सन्मान म्हणजे जामनेर तालुका साहित्य संस्कृती मंडळाने घेतलेल्या काव्यस्पर्धेत त्यांची ‘धनधान्याची खाण’ या कवितेला पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कवी डी.डी.पाटील, कवी अशोक कौतीक कोळी, कवी प्राचार्य विश्वास पडोळसे व मान्यवरांच्या हस्ते दोघी सन्मान प्रदान करण्यात आले.
त्याच दिवशी दुसरा सन्मान जळगाव येथे अभियंता भवनात झालेल्या 22 व्या राज्यस्तरीय सूर्योदय मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या ‘अधोरेखित’ काव्यसंग्रहाला विभावना पुरस्काराने ज्येष्ठ साहित्यीक प्राचार्य डॉ.संजीव गिरासे, प्रा.डॉ.तुषार चांदवडकर, नाशिक येथील प्रा.सुमनताई मुठे, सतीशजी जैन आदींच्या हस्ते मानपत्र व मानधन देऊन सन्मानित करण्यात आले. एकाच दिवशी मिळालेल्या या तिहेरी सन्मानाबद्दल चव्हाण यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.