विष देऊन प्रियकराची हत्या करणार्‍या प्रेयसीला फाशी


तिरुवनंतपुरम (20 जानेवारी 2025) : लग्न निश्चितीनंतर प्रियकरापासून सुटका मिळवण्यासाठी प्रेयसीने प्रियकराची विष देवून हत्या केली होती. याप्रकरणी आरोपी तरुणीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली.

केरळच्या तिरुवनंतपुरमच्या जिल्हा न्यायालयाने सोमवारी हा निकाल दिला. 24 वर्षीय तरुणीने ऑक्टोबर 2022 मध्ये आयुर्वेदिक टॉनिकमध्ये विष मिसळून प्रियकराची हत्या केली होती.

तरुणीचे काका निर्मलकुमारन नायर यांना हत्येला मदत करणे आणि प्रोत्साहन देणे आणि पुरावे नष्ट करणे यासाठी दोषी आढळले आणि त्यांना 3 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. मुलीच्या आईची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.

 


कॉपी करू नका.