भुसावळात सामूहिक विवाह सोहळ्यात 11 जोडपी विवाहबद्ध
भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे आयोजन
11 couples tied the knot in a mass wedding ceremony in Bhusawal भुसावळ (20 जानेवारी 2025) : भोरगाव लेवा पंचायत भुसावळ शाखेतर्फे 11 जोडप्यांचा सामूहिक विवाह शहरातील संतोषी माता हॉलमध्ये रविवार, 19 रोजी झाला. यंदा सामूहिक विवाहाचे 11 वे वर्ष होते. सकाळपासूनच नवरदेव, नवरीकडील वर्हाडी मंडळी हॉलमध्ये उपस्थित होते. सामूहिक विवाहाच्या अध्यक्षस्थानी कुटुंबनायक ललित पाटील होते. मान्यवरांचे भुसावळ शाखाप्रमुख सुहास चौधरी यांनी स्वागत केले. प्रास्ताविक कार्यक्रमाच्या चेअरमन आरती चौधरी यांनी केले. त्या म्हणाल्या की, समाजातील चुकीच्या खर्चिक पध्दतींना आळा बसावा म्हणून सामूहिक विवाह सोहळा हा उपक्रम राबवत जातो.
यांची विचार मंचावर उपस्थिती
विचार मंचावर कुटुंबनायक ललित पाटील, अॅड.रोहिणी खडसे, रजनी सावकारे, कुलसचिव अँड. संजय राणे, माजी आमदार निळकंठ फालक आदी समाजबांधव उपस्थित होते. यावेळी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांनी समाजाच्या उपक्रमाचे कौतुक करून भोरगाव लेवा समाजाने एक चांगला आदर्श पायंडा पाडल्याचे सांगत सामूहिक विवाह ही काळाजी गरज असल्याचे म्हटले. परीक्षीत बर्हाटे, आर.जी. चौधरी, हरीश फालक, सुभाष भंगाळे, चंद्रकांत चौधरी आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन कावेरी चौधरी यांनी केले.
या गावातील वर-वधूंचा समावेश
भोरगाव लेवा पंचायततर्फे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात नाशिक, बामणोद, न्हावी, डोंगरकठोरा, पाडळसे, रोझोदा, खिरोदा, आमोदा या गावातील वर-वधू यांचा समावेश होता. त्यांचा वैदिक पध्दतीने विवाह लावण्यात आला. वर-वधू सोबत प्रत्येकी दहा वर्हाडी होते. वधू-वरांना संसारोपयोगी वस्तू भेट देण्यात आल्या.
यांची विवाहास उपस्थिती
जळगावचे आमदार सुरेश भोळे, अॅड.संजय राणे, जे.टी.महाजन कॉलेजचे चेअरमन शरद महाजन, यावल तालुक्याच्या खरेदी विक्री संघाचे चेअरमन नरेंद्र नारखेडे, उद्योजिका मंगला पाटील, जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे, धनंजय चौधरी आदी उपथिस्त होते. राशी पाटील ही दिव्यांग विद्यार्थीनी पदवीधर झाल्याबद्दल तसेच धरती चौधरी विद्यापीठात प्रथम आल्याने व सुवर्णपदक प्राप्त झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.