के.नारखेडे विद्यालयात स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी उधळले कलागुणांचे रंग
भुसावळ (21 जानेवारी 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयात स्नेहसंमेलन व हस्तलिखित प्रकाशन समारंभ मंगळवारी झाला. प्रसंगी संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, ऑनररी जॉइंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सदस्य विकास पाचपांडे, कोटेचा विद्यालयाचे कलाशिक्षक अनिल कोष्टी, संगीत विषयतज्ञ शिरीष जोशी, विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षक एस.एल.राणे, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध नृत्याविष्कार, नाटिका, वेशभूषा, गीते सादर करून विद्यार्थी व पालकांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी सकाळ व दुपार शाखेला विद्यार्थ्यांकडून स्वरचित व स्वलिखित अशा वर्गवार हस्तलिखितांचे प्रकाशन करण्यात आले. सूत्रसंचालन सकाळ शाखेला नलिनी बावस्कर तर दुपार शाखेला भाग्यश्री पाटील, रिद्धी बाविस्कर, विजया बाविस्कर आणि जतीन पाटील यांनी केले.आभार एस.एल.राणे व एस.डी.वास्कर यांनी केले.
यशस्वीतेसाठी विनोद सोनवणे, एस.पी.महाजन, एस.टी.चौधरी, मनोज कुलकर्णी, दिनकर हेलोडे, प्रदीप सपकाळे, एस.पी.झांबरे, विनायक खडसे, ए.बी.कोल्हे, नेहा पाटील, सोनाली राणे, कांचन राणे यांनी परिश्रम घेतले.






