भुसावळात 23 रोजी जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा
District level marathon competition in Bhusawal on 23rd भुसावळ (21 जानेवारी 2025) : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त भुसावळ शहरात भव्य जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा दोन गटात होईल. त्यात पाचवी ते दहावीसाठी अडीच किलोमीटर तर 16 वर्षांवरील सर्वांसाठी खुल्या गटात सात किलोमीटर अंतर असेल.
लहान गटासाठी प्रथम पारितोषिक तीन हजार व मानचिन्ह, द्वितीय दोन हजार व मानचिन्ह तर तृतीय एक हजार व मानचिन्ह तसेच खुल्या गटासाठी प्रथम पाच हजार व मानचिन्ह, द्वितीय तीन हजार व मानचिन्ह, तृतीय दोन हजार व मानचिन्ह असेल. प्रत्येकाला सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
असा असेल स्पर्धेचा मार्ग
गुरुवार, 23 रोजी सकाळी सात वाजता लहान गटासाठी सरदार वल्लभभाई पटेल चौक, दगडी पूल, शिवाजी महाराज पुतळा, पांडुरंग टॉकीज, बाजारपेठ पोलीस स्टेशन, गांधी पुतळा मार्गे पुन्हा सरदार वल्लभ भाई पटेल पुतळा असा स्पर्धेचा मार्ग असेल तर खुल्या गटासाठी रदार वल्लभभाई पटेल पुतळ्यापासून लाईफ केयर हॉस्पिटल, नाहाटा कॉलेज चौफुली, अष्टभुजा मंदिर मार्गे बाजार पेठ पोलीस स्टेशन, गांधी चौक मार्गे पुन्हा सरदार वल्लभभाई पटेल येथे समाप्ती
होईल. अधिकाधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना परिवारातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी विनोद गायकवाड (9923439949) व एन.एस.म्हस्के (9823648270), पहपक धांडे (9371277236) यांच्याशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.






